: गँदरिंग सूत्रसंचालनासाठी खाली click करा
Download
सेवानिवृत्ती सूत्रसंचालनासाठी खाली click करा
Download
विवाह सोहळ्यासाठी सूत्रसंचालनासाठी खाली click करा
Download
*🎯क्रीडास्पर्धेत मशाल प्रज्ज्वलित करतांना---*
*🎤1)सा-या जगतात विराजमान*
*असे क्रीडाक्षेत्र करुया विशाल*
*आरंभ करुनी जागवुया चेतना*
*पेटवुनी तेजोमय ही क्रीडामशाल*
*🎤2)ज्ञानाची पराजुन तलवार*
*सोबत घ्या क्रीडेची ढाल*
*जाऊ साता समुद्रापार*
*सन्मानाने पेटवु क्रीडामशाल*
☄☄☄
☄☄☄☄☄☄
*🎯बाल आनंद मेळावा सूत्रसंचालनासाठी--*
*🖊बांधुनी तोरण आनंदाचे*
*हा दिन असा साजरा व्हावा*
*बालकांचा जीव इथे रुळावा*
*तयांना आनंद आनंद मिळावा*
*🖊वैविध्य साधत खाद्य पदार्थांनी*
*तृप्ततेचा ढेकर इथे मिळावा*
*पंख लावुनी या आनंदाला*
*भरवू बालकांचा आनंद मेळावा*
*🖊गंमत जंमत करुनी सारे*
*हसतील नाचतील इथे बालक*
*दौलत राष्ट्राची ही रक्षिण्या*
*होवुया आपण सुज्ञ पालक*
*🖊नाचुया खेळुया बागडुया इथे*
*चित्रातही रंग भरुया इथे*
*धमाल मजा करुया इथे*
*नको ती भीती नको ते दडपण*
*फुलाप्रमाणे डोलुया,फुलुया इथे*
☄☄☄☄
☄☄☄☄
"शाळा नसते केवळ खडू आणि फळा शाळा म्हणजे असते विद्यार्थ्यांचा लळा जिथे ह्रदये फुलतात, मने बहरतात ती शाळा म्हणजे संस्कृतीचा मळा वेगवेगळ्या कलागुणांचा जमला आहे मेळा तो पाहण्यासाठी आपण झालो आहोत गोळा हा तर खरा बालआनंद मेळा ,बालआनंद मेळा " 🙏🏻🙏🏻
🌹🌹 *परिपाठ सूत्रसंचालन*🌹🌹
"ढगातील पावसाची पडते,
धरणीशी गाठ.
अशा या सुंदर समयी,
सादर करत आहोत आम्ही परिपाठ"
१) *सुविचार*:-माणुसकी खूप कमी होत चाललीय. ती फक्त जपायला शिका. इतिहास सांगतो काल सुख होत.
विज्ञान सांगते उद्या सुख असेल.
पण माणुसकी सांगते, जर मनात चांगल्या विचारांची साठवण असेल तर दररोज सुख असते.
आणि म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे.......
२) *बातम्या*:- आपल्या शिक्षकांची आणि आपल्या पालकांची आपल्याकडून खूप मोठी स्वप्ने असतात. आणि ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आजच्या आधुनिक युगातील घटना आपल्याला माहित पाहिजे म्हणून आजचे बातमी पत्र घेऊन येत आहे....
३) *दिनविशेष*:-आयुष्यात उगवणारा प्रत्येक दिवस हा नवी उमेद घेऊन येत असतो.आणि या प्रत्येक दिवसाचे विशेष महत्व आपल्याला माहित असणे गरजेचे असते. म्हणून आजच्या दिवसाचे विशेष महत्व सांगण्यासाठी आजचे दिनविशेष घेऊन येत आहे........
४) *बोधकथा*:-सर्व काही मनासारखं होत नाही,पण मनासारखं झालेलं विसरू नका. आणि अशा या जीवनात वेळोवेळी कठीण प्रसंग हे येणारच पण कठीण प्रसंगी आपल्याला योग्य बोध घेऊन यशाचे शिखर गाठायचे आहे. म्हणून बोध देणारी बोधकथा घेऊन येत आहे......
५) *सामान्य ज्ञान प्रश्न* :-आपल्याला खूप काही प्रश्न पडत असतात. काही सामाजिक,आर्थिक ,वैज्ञानिक,
शैक्षणिक वगैरे. आम्हालाही काही प्रश्न पडलेले आहेत. बघू तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे येतात का म्हणून आजचे प्रश्न घेऊन येत आहे...
६) *कोडे* :-आपलं आयुष्य हे कोड्याप्रमाणेच असतं. थोडं कठीण,थोडं सोप तर थोडं मजेदार... आजचे कोडे हे आयुष्यासारखेच आहे. थोडे कठीण, थोडं सोप तर थोडं मजेदार म्हणून आजचे कोडे घेऊन येत आहे ......
७) *संवाद(इंग्रजी)*:-आपल्याला इतर विषयाबरोबरच इंग्रजी विषयही सोपा वाटावा. म्हणून इंग्रजी विषयाचा पाया भक्कम होण्यासाठी आपल्याला इंग्रजी शब्दाबरोबर आपल्याला छोटे छोटे संवाद सादर करता आले पाहिजेत. म्हणून आजचा इंग्रजी संवाद घेऊन येत आहे...
शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन
"जीवन आहे खरी कसोटी
मागे वळून पाहू नका.
येईल तारावयास कोणी
वाट कुणाची पाहू नका..
यश तुमच्याजवळ आहे.
जिंकल्याशिवाय राहू नका..
--------------------
आयुष्य म्हणजे पुढं पुढं चालत राहणं आहे,
कुठलंही यश म्हणजे शेवटचा टप्पा नाही,
अन् अपयश म्हणजे प्रवासाची अखेर नाही!
: शून्यावर बाद होणं म्हणजे सारं काही संपणं नव्हे!
तर
पुढच्या डावातील शतकाचीच
ती जणू पायाभरणी होय!
माणसाचं आयुष्य म्हणजे जणू क्रिकेटचा खेळ!
शतक म्हणजे जणू यश!
शून्य म्हणजे जणू अपयश !!
: 🌹दिपप्रज्वलन करताना🌹
🎤 " ज्ञान विज्ञान कलेची
इथे जाहली मांदियाळी
कुलदिपक लावितो
विद्धेची ही नित्य दिवाळी "
🎤 " खूप काही बोलणार होतो
बोलता मात्र येणार नाही
शारदेच्या पूजनाच्या वेळी
बुद्धी माझी तोलणार नाही "
पोरीची पसंती आली की
बापाचं काळीज धडधडतं
चिमणी घरटं सोडणार म्हणून
आतल्या आत खूप रडतं
हसरे खेळकर बाबा एकदम
धीर गंभीर दिसू लागतात
पोरीला पाणी मागण्या पेक्षा
स्वतःच उठून घेऊ लागतात
या घरातला चिवचीवाट आता
कायमसाठी थांबणार असतो
म्हणून बाप लेक झोपल्यावर
तिच्याकडे पाहून रडत असतो
अंबुच्या लिंबूच्या करत करत
मोठी कधी झाली कळलं नाही
बाप सांगतो तिलासोडून
मला पाणीही गिळलं नाही
दिवसातून एकदा तरी
मायेनं जवळ घ्यावं वाटतं
परक्याचं धन असलं तरी
द्यायला मात्र नको वाटतं
उठल्या पासून झोपे पर्यंत
बाबाची काळजी घेत असते
आज ना उद्या जाणार म्हणून
पोरगी जास्तच लाडाची असते
पोरगी जाणार म्हणलंकी
बाप आतून तुटून जातो
कळत नाही बैठकीतून
अचानक का उठून जातो ?
इकडे तिकडे जाऊन बाबा
गुपचूप डोळे पुसत असतात
लेकीचं कल्याण झालं म्हणून
पुन्हा बैठकीत हसत असतात
तिचा सगळा जीवनपट
क्षणाक्षणाला आठवत राहतो
डोळ्यात येणाऱ्या आसवांना
बाबा वापस पाठवत राहतो
बी. पी. ची गोळी घेतली का ?
आता कोण विचारील गं ?
जास्त गोड खाऊनका म्हणून
कोण कशाला दटवील गं ?
बाबा कुणाचं ऐकत नाहित पण
पोरीला नकार देत नाहीत
तिने रागात पाहिलं की मग
ताटात गुलाबजाम घेत नाहीत
एका अर्थानं पोरगी म्हणजे
काळजी करणारी आईच असते
पोटचा गोळा देणाऱ्याची
कहाणी फार वेगळी असते
तळपता सूर्य तो महान
त्याची सावित्री ही ठरली ज्योती
विद्यादानाचे व्रत घेउनी
हाती
सावित्रीबाई बनल्या क्रांती ज्योती
: नव्या युगाची मी नवमहिला
गायीन नविन गाणी
मी न दासी मी न देवता
जगेन माणुस म्हणुनी जगेन माणुस म्हणुनी
ओढ असते स्वप्नाची
ओढ आपल्या माणसाची
जगावस वाटत घेउन सोबत दोन शब्दांची
त्याच दोन शब्दासह हे शुभेच्छा पत्र खास आपल्यासाठी 🌹
नवे वर्ष. ....
नव्या उमेदिचे,
नव्या उभारीचे
जुने सगळे विसरून ,
पुन्हा नव्या आशेचे....
नवे वर्ष. ...
आनंदाचे,
कडू भूतकाळ विसरण्याचे,
चांगल्या आठवणी सोबत घेऊन,
नवीन उंबरठा ओलांडण्याचे .
नवे वर्ष....
तुझे माझे गीत गाण्याचे,
पुन्हा सर्व ऋतू अनुभवन्याचे.
रुसणे फुगणे मागे ठेऊन,
फक्त प्रेम सोबत नेण्याचे. .
नवे वर्ष. .....
सुखदुःखाचे क्षण,
एकत्र जगण्याचे.
नव्याने नाती जोडण्याचे,
सोबत आहे ते जपण्याचे. ..
नवे वर्ष. .....
कल्पकतेने सजवायचे ,
प्रेमाने ते रचायचे.
सोबतीने उभारायचे,
ओलाव्याने सावरायचे. .
नवे वर्ष. .....
अनुभवाच्या खाणीतून,
स्वतःला सिद्ध करायचे.
नवीन संकल्प करून,
ते पूर्ण करण्याचे. ..
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*मेरी धडकनो में धडकता रहे तु , मेरे देश तुझको नमन है मेरा, जीऊं तो जुबां पर तेरा नाम हो मरूं तो तिरंगा कफन हो मेरा।.*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
: *कभी सनम को छोड़ के देख लेना, कभी शहीदों को याद करके देख लेना, कोई महबूब नहीं है वतन जैसा यारो, मेरी तरह देश से कभी इश्क करके देख लेना.. **
*वंदे मातरम*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
: 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*वतन हमारा ऐसा कोई छोड़ ना पाये ,*
*रिश्ता हमारा कोई तोड़ ना पाये ,*
*दिल एक है हमारा और एक जान है , हिंदुस्तान हमारा है हम इसकी शान है ..*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
: *दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है . सिर हमेशा ऊँचा रखना इसका जब तक दिल में जान हैं ..*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
: 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*कुछ नशा तिरंगे की आन का है ,*
*कुछ नशा मातृभूमि की शान का है ,*
*हम लहरायेंगे हर जगह ये तिरंगा , नशा ये हिन्दुस्तां के सम्मान का है ..*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
: *जब आँख खुले तो धरती हिन्दुस्तान की हो:*
*जब आँख बंद हो तो यादेँ हिन्दुस्तान की हो:*
*हम मर भी जाए तो कोई गम नही लेकिन;*
*मरते वक्त मिट्टी हिन्दुस्तान की हो।*
🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩
: *अगर मैं जन्म लू दुबारा इंसान में*
*भगवन देना मिट्टी हिन्दुस्तान की*
*होंठो पे गंगा हो हाथो में तिरंगा हो"*
🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮
चला तर मग टाळ्या मिळवण्यासाठी बनवूया चारोळी,-----*
*धारेशिवाय किंमत नाही*
*तलवारीच्या पातीला*
*पाण्याशिवाय किंमत नाही*
*धरणाच्या मातीला*
*सुगंधाशिवाय किंमत नाही*
*फुलांच्या जातीला*
*रसिक माय-बाप हो,*
*तुमच्या टाळ्यां शिवाय किंमत नाही*
*आमच्या कार्यक्रमाच्या साथीला*......
[08/03, 11:04 AM] +91 96733 77161: जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
आईच्या आईपणाला
तिच्यातील बाईपणाला
तिने सोसलेल्या नऊ महिन्याच्या कळांना
त्यासाठी मिळालेल्या हत्तीच्या बळांना
शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा
बायको नावाच्या अर्धांगिनीला
तिच्यात दडलेल्या कारभारणीला
संसारातील तिच्याबरोबरच्या प्रत्येक क्षणाला
दोन घर जोडणाऱ्या तिच्या विशेष मनाला
शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा
सख्या , चुलत , मावस बहिणीला
बहिणी सारख्या प्रिय वहिनीला
त्यांनी बांधलेल्या प्रत्येक राखीला
माहेरी झालेल्या त्यांच्या वजाबाकीला
शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा
मावशी आणि आत्याला
त्यांनी जपलेल्या जुन्या नात्याला
मामी आणि तिच्या खट्याळ पोरीला
शाळा कॉलेजातील प्रत्येक दिलचोरीला
शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा
आज्जीच्या संस्कार सृष्टीला
तिने पेरलेल्या अनुभवी दूरदृष्टीला
घरच्या आणि शेजारच्या काकूला
सुख दुःखात त्यांनी दिलेल्या टेकूला
शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा
मनभूमी ते कणभूमी गाजवणाऱ्या
विश्वातील प्रत्येक क्षेत्रात डंका वाजवणाऱ्या
भूत , वर्तमान , भविष्यकाळी रणरागिनींना
तुमच्या आमच्या सर्वांच्या माता भगिनींना
हार्दिक शुभेच्छा🙏हार्दिक हार्दिक🙏शुभेच्छा....
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏?
[08/03, 8:15 PM] +91 88056 25211: स्पर्धेसाठी
💃🏻स्त्री शक्तीचा जागर💃🏻
नका करू गर्भपात स्त्रीभ्रूण हत्येचा
आनंदाने जगू द्या हक्क द्या जगण्याला।।
खुलण्या आधीच नका तोडू
बहरु द्या जीवनाला
सुंदर रंग दुनियेचे
रंग भरू द्या स्वप्नांना।।
नाहीस अबला दाखव धाडस
जिंकून साऱ्या दुनियेला
अन्यायाचा नाश करोनी
दिशा दाखव जगण्याला।।
दोन्ही घराला संस्कार देणारी
संस्काराची पणती तू
आत्मनिर्भय संरक्षणाची
मशाल आता पेटव तू।।
सुखदुःखाची सावली जन्मभर साथ असते
क्षणभराची पत्नी अनंतकाळची माता असते
कितीही वार होतील जीवनावर
संरक्षण करणारी तू ढाल असते।।
✍🏻सुचिता कुलकर्णी
सदस्या:- *जीवन गाणे समूह*
जि. प.प्रा.शा.पाटोदा
ता.परतूर जि जालना
[08/03, 11:00 PM] +91 94217 62297: एक स्त्री
आई म्हणून
बहीण म्हणून
मैत्रीण म्हणून
बायको म्हणून
मुलगी म्हणून
तिच्या कर्तव्यात कधीही कमी पडत नाही
तिला हवी असते फक्त तुमची साथ
त्या प्रत्येक स्त्री ला सलाम
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
[09/03, 9:13 AM] +91 90964 30907: अपने वो नही होते जो
*तस्वीर*
में साथ खड़े होते हैं,
अपने वो हैं जो
*तकलीफ*
में साथ खड़े होते हैं ....
[09/03, 2:25 PM] +91 90964 30907: मेरी खामोशियों में भी फसाना ढूंढ लेती है..
बड़ी शातिर है ये दुनिया बहाना ढूंढ लेती है..
हकीकत जिद किए बैठी है चकनाचूर करने को..
मगर हर आंख फिर सपना सुहाना ढूंढ लेती है..
न चिडि़या की कमाई है न कारोबार है कोई..
वो केवल हौसले से आबोदाना ढूंढ लेती है..
समझ पाई न दुनिया मस्लहत मंसूर की अब तक..
जो सूली पर भी हंसना मुस्कुराना ढूंढ लेती है..
उठाती है जो खतरा हर कदम पर डूब जाने का..
वही कोशिश समन्दर में खजाना ढूंढ लेती है..
*निना* ✍🏻💐💐
14 comments:
खूप छान , धन्यवाद
पण
लग्नाचे सूत्रसंचलन दाखवत नाही ?
यासाठी प्रयत्न करा
खुप छान आमच्या गणेश उस्तव विविध गुनदर्शन मध्ये आपले सूत्र संचलन आम्हाला उपयोगास आले.............धन्यवाद
खूप छान ब्लॉग सर
आपल्यासारख्या उत्साही व उपक्रमशील शिक्षकामुळेच शिकणे आनंददायी होत आहे.
शुभेच्छा!
मस्त सर
¬¬¬¬¬खुप छान ! आमच्या शासकीय कार्यालयातील सरांच्या निवृत्ती कार्यक्रमासाठी उपयुक्त असे मार्गदर्शन मिळाले. धन्यवाद.
Khupch sundar sir
खरंच 1 नंबर!पण, कृपयाआपणाला विनंती की आपण लग्नाच्या महत्त्वपुर्ण टिप्स द्या.
खूपच छान
बहोत बढियाँ।सरजी.
लयभारी सर
कृपया महाराष्ट्र दिनाचे सूत्र संचालन द्या
खुप सुंदर संकलन
खूप छान संकलन
. अत्यंत सुंदर शब्दांकन सर
नक्कीच सर्वाना याचा फायदा होईल,.
Post a Comment