नमस्कार... गरुडझेप ब्लॉगवर मी श्री.महादेव भिमराव तोडकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावे लागते

पृष्ठे

सुविचार

     दैनंदिन टाचण वहीवर सुविचार लिहिण्यासाठी pdf
                          Download     




                      सुविचार

💐 जीवनात‪ अडचणी‬ त्यालाच येतात,जी व्यक्ती नेहमी‪ जबाबदारी‬ उचलायला तयार असते..!
आणि जबाबदारी घेणारे कधी‪ ‎हारत‬ नाहीत..ते‪ जिंकतात‬ किंवा‪ शिकतात‬...

* समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे 
अधिक भयानक असतात 
म्हणुन मनातल्या गोष्टी 
जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा 
कारण त्याने मन हलके तर होईलच 
आणि लढण्याची ताकद पण येईल...!




💐मी दुनियेबरोबर "लढु" शकतो 
पण "आपल्या माणसांबरोबर" नाही, 
कारण "आपल्या माणसांबरोबर" 
मला "जिकांयचे" नाही तर जगायचे आहे... !! 




💐"जीवनातिल कडवे सत्य" 
अनाथ आश्रमात मूले असतात, "गरीबांचे"... 
आणि... 
वृद्धाश्रमात म्हातारे असतात " "श्रीमंतांचे"....!!!



💐हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. 
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की, 
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही.. 
आणि ती असते.. "आपलं आयुष्य".. 
म्हणूनच.. ....मनसोक्त जगा !!! 

+++

💐जन्म दुसऱ्याने दिला.
नाव दुसऱ्याने दिले.
शिक्षण दुसऱ्या कडून घेतले.
लग्न दुसऱ्याने जुळवले.
कामावर दुसऱ्याने लावले.
शेवटी स्मशनातही दुसरेच नेणार ... 
तरीही माणूस इतका घमंड का करतो?
* अनुभव म्हणजे तुमच्यासोबत जे घडले ते नव्हे, तर जे घडले त्यावर तुम्ही जे केले तो अनुभव! 

* लोक तुमच्याशी कसे वागतात, हे त्यांचे कर्म! पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रीया देता, हे तुमचे कर्म!
* एखादी समस्या सुटण्यासारखी असेल तर चिंता करून काय उपयोग? कारण, ती केव्हा ना केव्हा सुटणारच! 
एखादी समस्या सुटण्यासारखी नसेल, तरीही चिंता करून काय उपयोग? कारण, ती कधी सुटणारच नाही.
* भीतीला टाळाल- तर ती वाढत जाते. भीतीचा सामना कराल, तर ती पळून जाते.
* समस्या कोणत्याही दिशेने येवू द्यात, त्या समस्येवरचे समाधान तुमच्याकडून जावू द्या!
* कठीण काळ कायम टिकाऊ नसतो, पण कठीण लोक असतात.
* अपयश कायम नसते. यश सुद्धा!
* मुर्खाचे हृदय जिभेवर असते, शहाण्याची जीभ हृदयात असते.
* चिंतेसारखे शरिराला जाळणारे दुसरे इतर काहीही नाही. - पंचतंत्र
* पुत्र सुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो पैसा स्वतः कमावेल. पुत्र कुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो मिळालेला पैसा गमावेल.
* स्वप्ने पाहिली पाहिजेत. ती पूर्ण होतात. नाहीतर, निसर्गाने आपल्याला ते पाहाण्याची शक्ती कशाला बरे दिली?
* "दिलेले वचन" एखाद्या "घेतलेल्या कर्जासारखेच" आहे.
* लोक तुमचा "सल्ला" मानत कधीच नाहीत. ते तुमचे "उदाहरण" घेतात.
* प्रशंसा - स्वीकारायला आणि करायला शिका.
* एखाद्या कृतीमध्ये पाप नसते. त्यामागच्या हेतूमध्ये पाप असते. जग आपल्याला आपण केलेल्या कृत्यांवरून तोलते. देव आपल्याला आपल्या हेतूंद्वारे मापतो. मग आपला हेतू आणि कृत्ये शुद्धच असली पाहिजेत. नाही का?
* कसलीच लाज नसणे हीच एक लाजीरवाणी गोष्ट!
* शब्द विविध पद्धतीने योजले असता वेगेवेगळा अर्थ निघतो. आणि अर्थ वेगेवेगळ्या पद्धतीने योजल्यास वेगळा परिणाम साधता येतो.
* काही लोक यशाची फक्त स्वप्ने बघतात. इतर लोक जागे होवून ती स्वप्ने पूर्ण होण्यासाठी धडपडतात.
* यशासारखे प्रेरणादायी दुसरे काहिही नाही. अपयशासारखा शिक्षक दुसरा कोणीही नाही. जीवनात पुढे जाण्यासाठी आपणांस दोन्ही आवश्यक आहेत.
* वाईट मनुष्य भीती दाखवली तरच आज्ञा पाळतो. चांगला मनुष्य प्रेमाद्वारे.
* मनुष्य ज्याला घाबरतो त्यावर कधीही प्रेम करू शकत नाही.
* आपण एखादी गोष्ट करू शकतो की नाही, हे ती गोष्ट करून पाहील्याशीवाय समजत नाही.

* ज्याचा शेवट गोड, ते सगळेच गोड!

No comments: