विचारी पाखरू
शेतकऱ्याची अवस्था राजकारनात कडिपत्त्यांसारखी आहे. चविपुरतेच वापरने राजकारन संपलेकि कादुन टाकने. एक विचारी पाखरू शेतकऱ्याचा विचार करतय.विचारी पाखरू.
भिरभिर फिरतया भरल्या
कनसाभवती नादान पाखरू
गोफणीला पण झुमानत नाही
म्हणतया किती किती दाण चोचीत भरु.
कुणब्यान कश्टान पीकवलेल मोती
मन हेलावतय पोटावर कस मारु
बेईमान वाऱ्यान झडलेल उचलुन
भुकेल्या पोटाला आधार करु.
घरटयातल्या पिलासाठि गोफणीतल्या
गोटी सन्ग जगन्यासाठी लठा सुरू
चोचीत चोच घालन्यास आतुर
आसल येड भाबड लेकरू.
भुइवरल चार दान टिपून
बळीराजा म्हणनार नाही लुटारु
कुबेराच धन पोहोचाव दोघाघरी
देवा स्वप्न होऊ दे साकारु.
---------कवी आबासो माळी
७४४७३५१७६०
---------–---------------------------------------
*फुटका आरसा अन तुटका कंगवा*
----------------------------------------------ज्यांचं ज्यांचं वय आज
40-45 आहे,
त्यांच्या स्वभावामधे
बराच संयम आहे.
कुठून आला हा संयम,
एवढी नम्रता कशी ?
अपमान पचवण्याची
ताकद आली कशी ?
या प्रश्नांची उत्तरं
जरूर तुम्हाला मिळतील,
जर तुम्हाला बालपणीचे
त्यांचे दिवस कळतील.
दारिद्र्य आणि गरीबी
घरोघरी होती,
अंग घासायला दगड
अन दाताला राखुंडी होती.
कशाचं बॉडी लोशन
अन् कसचं Hair Gel,
हिवाळ्यात अंग उललं की
आमसुलाचं तेल.
तोंड पाहण्यासाठी नेहमी
फुटका आरसा असायचा
इतकुश्याच तुकड्यामधे
एकतर फक्त डोळा ,नाहीतर कान दिसायचा.
सगळे दात असलेला कंगवा
कधीही मिळाला नाही,
अफगाण स्नोचा भाव आम्हाला
कधीच कळला नाही.
चड्डी अन् सदऱ्याला
तांब्याची इस्त्री असायची,
न्याहारीला लोणच्यासोबत
शिळी भाकरी मिळायची.
कबड्डी , लंगडी , कोया
फ़ुकटे खेळ असायचे,
दोन्ही घुडगे फुटले तरी
पोरगे खूश दिसायचे.
कांद्याचे पोहे अन्
मुरमुऱ्याचा चिवडा,
पेढ्याचा तुकडा मिळाला की
आनंद आभाळाएवढा.
काजू , बदाम यांच्याबद्दल
फक्त ऐकून होतो,
एखादा पाहुणा आला की
अंगणात नाचत होतो.
मोठ्या माणसांसमोर जायची
हिंमतच नसायची,
वडील बैठकीत असले की
पोरं ओसरीवर दिसायची.
आजकालच्या पोरांना हे
खरं वाटणार नाही,
आई वडिलांच्या गरीबीवर
विश्वास बसणार नाही.
म्हणून म्हणतो पोरांनो
आई वडिलांशी बोला,
काही नाही मिळालं तरी
आनंदाने डोला.
नसण्यातच मजा होती
मोठं झाल्यावर कळतं,
खरं शिक्षण माणसाला
गरीबीकडूनच मिळतं. ---कवी आबासो माळी
-----------------------------------------------------------------/
🌹💐 प्रिय...आई वडील 💐🌹
व्यथा
निसर्गाच्या चक्रानेनाही केली कधी साथ
कधी दुष्काळ कधी अतिव्रश्टिने
मारली पोटावर लाथ .
बळीराजाच्या देशात
झालेत त्याचेच अश्रू स्वस्त
राजकीयांनी प्रसिद्धीसाठी
केले त्यांचे जीवन फस्त .
भांडवलदार झालेत
त्यांच्या भूमीचे वारस
कवडीमोलने देउन भाव
दाखवतात स्वत: निरागस .
सावकाराने रोज प्यायला
त्यांच्या कष्टाचा आश्रृ
दरमहा देउन दम म्हणतो
व्याज कसे विसरू .
शेतीप्रधान देशात
नाही जगला अन्नदाता
फक्त कमावून नोटा
नाही होणार कोण 'विधाता'.
---------कवी आबासो माळी
No comments:
Post a Comment